पाकिस्तानात जफर एक्सप्रेसवर हल्ला करून अपहरण केलेल्या सर्व २१४ ओलिसांची हत्या केल्याचा दावा बलोचिस्तान लिबरेशन आर्मीनं केला आहे. ओलीस आणि कैद्यांच्या सुटकेसाठी दिलेली ४८ तासांची मुदत पाकिस्ताननं पाळला नाही असा दावा संघटनेचे प्रवक्ते जीयांद बलोच यांनी केला आहे.
बलोचिस्तान लिबरेशन आर्मीनं कायमच आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन केल्याचा, मात्र पाकिस्तानच्या हटवादी भूमिकेमुळं ओलिसांची हत्या केल्याचा दावाही त्यांनी केला आहे. यापूर्वी, या घटनेत अपहरण झालेल्या किमान ३४६ ओलिसांची सुटका केल्याचा आणि सर्व ३३ हल्लेखोरांना ठार केल्याचा दावा पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी केला होता.