रासायनिक खतं, कीटकनाशकं, शेतीची औजारं यांच्यासह शेतीसाठीच्या आवश्यक वस्तूंवरचा जीएसटी कर रद्द करावा, किंवा त्याचा परतावा द्यावा अशी मागणी अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकडून होत आहे. कृषीसंबंधी वस्तूंवर ५ ते २८ टक्क्यांपर्यंत जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर आकारला जातो, त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात हेक्टरी जवळपास १५ हजारांची वाढ झाली असल्याचा शेतकऱ्यांचा दावा असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
Site Admin | March 23, 2025 3:20 PM | Akola | farmers | GST
अकोला : शेतीच्या वस्तूंवरचा GST कर रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी
