आरोग्य विभागाच्या नोव्हेंबर महिन्याच्या निर्देशांक मूल्यांकनात अकोला इथल्या जिल्हा स्त्री आरोग्य रुग्णालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या मूल्यांकनात राज्यभरातील महिला रुग्णालयांची क्रमवारी जाहीर करण्यात आली. यात अकोला इथल्या रुग्णालयाला ९५ गुण मिळाले आहेत.
राज्यातल्या आरोग्यसेवेचा दर्जा सुधारण्यासाठी जिल्हा स्त्री रुग्णालय, जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडून देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेचे मूल्यांकन करण्यासाठी निर्देशांक निश्चित करण्यात आले आहेत. या निर्देशांकानुसार आरोग्य सेवांच्या अद्ययावत परिस्थितीचं जिल्ह्यांना आकलन व्हावे, यासाठी स्त्री रुग्णालयांचं दरमाह रँकिंग करण्यात येतं. त्यानुसार अकोल्यातल्या स्त्री रुग्णालयानं सलग सहाव्यांदा प्रथम क्रमांक पटकावला आहे.