डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अकोल्याचं डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, राज्यशासनाचा कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने उद्यापासून येत्या २९ डिसेंबरपर्यंत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन अकोला इथं भरवण्यात येणार आहे. प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अन्य मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या प्रदर्शनात फळबाग, भाजीपाला, फुलशेती, वनौषधी, कापूस, ज्वारी, गहू, कडधान्य, तेलबिया, पाणलोट विकास, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, कृषी अभियांत्रिकी आणि अवजारांच्या दालनांसह राज्याच्या कृषी विभागाची, इतर कृषी विद्यापीठांची, संलग्न कृषी संस्थांची तसंच शासनाच्या इतर विभागांची दालनं असणार आहेत.