उज्ज्वल भविष्यासाठी नियोजन आणि सुरक्षितता महत्वाची असून, महिलांनी सुरक्षा विमा आणि जीवनज्योती योजनेचा लाभ घ्यावा, असं अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांनी आज सांगितलं. उमेद, अर्थात ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे अधिकारी आणि आणि बँकर्स साठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. सर्व बँक अधिका-यांनी या दोन्ही योजना येत्या 14 जानेवारीपर्यंत मोहिम स्वरूपात राबवून अधिकाधिक महिलांना त्याचा लाभ द्यावा, तसंच बँकेत नवीन खातं उघडणं, बँक कर्ज प्रस्ताव, व्यक्तिगत कर्ज प्रस्ताव ही कामं पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. उमेद अभियाना अंतर्गत 13 हजार महिला बचत गटांच्या माध्यमातून एकूण 1 लाख 25 हजार महिला जोडल्या गेल्या आहेत.
Site Admin | January 7, 2025 7:09 PM | Akola