अखिल मराठा फेडरेशनच्या तिसऱ्या संमेलनाचं उद्घाटन आज रत्नागिरीत झालं. महाराष्ट्रातली ७५ मराठा मंडळं या संमेलनात सहभागी झाली आहेत. मराठा मंडळाच्या कार्यात तरुणांनी यायला हवं, स्पर्धा परीक्षा देऊन पुढं जायला हवं असं अखिल मराठा फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश सुर्वे यावेळी म्हणाले.
या संमेलनात डॉक्टर सुरेश हावरे यांना अखिल मराठा समाजभूषण पुरस्कार, इतिहासकार डॉक्टर जयसिंगराव पवार यांना अखिल मराठा समाजरत्न पुरस्कार आणि आधुनिक अभियांत्रिकी विषयातले तज्ज्ञ उमेश भुजबळराव यांना अखिल मराठा समाज गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.