डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मराठी भाषेनं शोषित, वंचित वर्गासाठी सामाजिक मुक्तीचं द्वार उघडलं – प्रधानमंत्री

मराठी भाषेनं समाजातल्या शोषित, वंचित वर्गासाठी सामाजिक मुक्तीचं द्वार उघडलं असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत केलं. ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ज्ञानबा तुकारामांच्या मराठीला राजधाधी  दिल्ली मनापासून अभिवादन करते, असं ते म्हणाले.

 

यावेळी अनेक मराठी साहित्यिक, समाज सुधारक, मराठी साहित्य यांचा उल्लेख केला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देता आला हे सौभाग्य असल्याचं ते म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळं मराठी भाषा आणि परंपरेशी संबंध आला. त्यामुळं मराठी बोलण्याचा प्रयत्न, मराठीचे नवीन शब्द शिकण्याचा प्रयत्न आपण नेहमीचं केला असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.         

 

भाषा ही संस्कृतीची संवाहक आहे. त्या समाज निर्माणात महत्त्वाची भूमिका बजावतात असंही प्रधानमंत्री म्हणाले. १०० व्या साहित्य संमेलनच्या तयारीला आतापासून लागण्याचं आवाहन त्यांनी केलं. त्यात अधिकाधिक युवकांना सामावून घ्या,अधिकाधिक लोकांना मराठी शिकवण्यासाठी प्रयत्न करा अशा सूचना त्यांनी केल्या. 

 

अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिलं संमेलन दिल्लीत होतंय ही अभिमानाची गोष्ट असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस म्हणाले. मराठी लोकभाषा झाल्यानं ती समृद्ध झाल्याचं त्यांनी सांगितलं. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी प्रधानमंत्र्यांचे आभार मानले. संमेलनाला महिला अध्यक्ष मिळाल्याबद्दल पवार यांनी तारा भवाळकर आणि साहित्य महामंडळाचं अभिनंदन केलं. राजकारण्यांनी साहित्य संमेलनाच्या मंचावर येऊ नये, असं मत त्यांनी व्यक्त केलं. यावरुन दरवर्षी वाद होतो असं म्हणत त्यांनी विधीमंडळात आलेल्या विविध साहित्यिकांची उदाहरणं दिली आणि याविषयावरुन वाद नको असं आवाहन केलं.

 

संमेलनाध्यक्ष तारा भवाळकर यांनी छोटेखानी भाषणात भाषा ही जोडणारी हवी, तोडणारी नाही, असं मत व्यक्त केलं. 

 

भाषा ही जैविक गोष्ट आहे, ती बोलली तर जिवंत राहते, असं त्या म्हणाल्या. साहित्य संमेलनाची अध्यक्ष महिला झाली हा मुद्दा नसून गुणवत्ता हा मुद्दा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी प्रास्ताविक केलं आणि आयोजक संजय नहार यांनी संमेलनाच्या मागची भूमिका मांडली. काश्मिरमधली गायिका शमिमा अख्तर हिनं राज्य गीत आणि पसायदान म्हटलं.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा