उत्तर प्रदेशात होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या आकाशवाणीच्या ‘कुंभवाणी’ वाहिनीचं लोकार्पण आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते प्रयागराज इथे झालं. महाकुंभ मेळा हा उत्सव जाती धर्मापलिकडे जाऊन एकतेचा संदेश देतो असं ते यावेळी म्हणाले. याच कार्यक्रमात त्यांनी ‘कुंभमंगल धून’चं देखील उद्घाटन केलं. प्रसारभारतीचे अध्यक्ष डॉ. नवनीतकुमार सहगल, मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी, दूरदर्शनच्या महासंचालक कांचन प्रसाद, तसंच आकाशवाणीच्या महांचालक डॉ. प्रज्ञा पालिवाल आणि इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.
डॉ सहगल यांनी सांगितलं.या आकाशवाणी वाहिनीवरून, आजपासून २६ फेब्रुवारी पर्यन्त महाकुंभमध्ये होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमावर आधारित अनेक कार्यक्रम प्रसारित करण्यात येतील. सकाळी ५ वाजून ५५ मिनिटांपासून रात्री १० वाजून ५ मिनिटांपर्यंत, या वाहिनीचं प्रसारण सुरू राहील. ही एफ एम वाहिनी १०३ पूर्णांक ५ अंश मेगा हर्टझवर, न्यूज ऑन ए आय आर या ॲप तसंच वेव्ह्ज ओ टी टी वर ऐकता येईल.