ऐतिहासिक अर्थसंकल्प, लाडकी बहीण योजना, तीन मोफत गॅस सिलिंडर आणि शेतकऱ्यांसाठी वीजबिल माफी अशा योजना आणि निर्णयाद्वारे राज्य सरकारने लोकोपयोगी काम केल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. विधानसभा निवडणूक कार्यक्रमाचं वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर पवार यांनी समाजमाध्यमावरल्या संदेशाद्वारे संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या योजना घरोघरी पोहोचवण्यासाठी परिश्रम घेतले, शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा राष्ट्रवादी काँग्रेस समाजातल्या प्रत्येक घटकासाठी वचनबद्ध असल्याचं अजित पवार म्हणाले.
तर, विधानसभा निवडणुकीत झोकून देऊन काम करण्याचं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना केलं.