राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ हे निवडणूक चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याचं स्पष्ट करणारं जाहीर प्रकटन ३६ तासांच्या आत मराठीसह इतर भाषांमधल्या वृत्तपत्रांमध्ये ठळक पद्धतीनं छापू, असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या तोंडी सूचनेनंतर अजित पवार यांचे वकील बलबीर सिंह यांनी पवारांच्या वतीनं ही हमी दिली. विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह वापरण्यापासून रोखण्याची मागणी करणारी याचिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटानं केली होती, त्यावर न्यायमूर्ती सूर्य कांत, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती उज्जल भुयान यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी अजित पवार यांच्या वकिलांनी हे आश्वासन दिलं.
Site Admin | November 6, 2024 7:00 PM | ajit pawar | NCP