विधानसभेची ही निवडणूक आपण अतिशय गांभीर्याने घेतली पाहिजे, महिला आणि युवकांनी या निवडणुकीत सतर्क राहिले पाहिजे अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचं ‘राज्यस्तरीय महिला व युवा पदाधिकारी अधिवेशन’ मुंबईतल्या महिला आर्थिक विकास मंडळाच्या सभागृहात कालं झालं, त्यावेळी ते बोलत होते.
आपण धर्मनिरपेक्ष विचार सोडलेला नसून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिव-शाहू -फुले – आंबेडकरांच्या विचारधारेवरच पुढे चालला असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केले. या अधिवेशनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, रूपाली चाकणकर, सुरज चव्हाण, शिवाजीराव गर्जे उपस्थित होते.