सामाजिक विकासाच्या कामासाठी सरकार कायमच पुढे राहील असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज परभणी इथं श्री क्षेत्र नृसिंह मंदिराला भेट दिल्यावर बोलत होते. परभणी जिल्ह्यातली विविध विकासकामं आणि योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात पवार यांच्या उपस्थितीत आज जिल्हास्तरीय बैठक होणार आहे.
पवार आज हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यालाही भेट देणार आहेत. परभणीत महापालिकेचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री हिंगोली जिल्ह्यातील गुंज या गावाला भेट देऊन विहिरीत पडून मृत्युमुखी पडलेल्या सात महिलांच्या कुटुंबीयांना भेट देणार आहेत.