द्राक्षापासून तयार होणाऱ्या बेदाण्याला कृषिमाल म्हणून मान्यता मिळण्यासाठी नाबार्डसह अन्य संबंधित यंत्रणांसोबत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत ठरलं. बेदाण्यावरचा पाच टक्के जीएसटी रद्द करण्यासाठी केंद्रीय जीएसटी परिषदेला पत्र लिहिण्यात येईल, द्राक्ष आणि फळबागांना प्लास्टिक आच्छादनासाठी अनुदान मिळावं यासाठी हॉर्टीकल्चर बोर्डाकडे मागणी करण्यात येईल, असे निर्णय या बैठकीत घेण्यात आले.
Site Admin | August 31, 2024 7:26 PM | ajit pawar
द्राक्ष बेदाण्याला कृषिमाल म्हणून मान्यता मिळण्यासाठी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल – उपमुख्यमंत्री अजित पवार
