राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलीवन यांच्यासोबत काल नवी दिल्लीत बैठक घेतली. यावेळी डोवाल आणि सुलीवन यांनी भारत आणि अमेरिका यांच्यात गंभीर आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानात धोरणात्मक भागीदारी वाढवण्याबाबत चर्चा झाली. सह-उत्पादन, सह-विकास आणि संशोधन आणि विकासाच्या संधींवर लक्ष केंद्रित करण्याचं उद्दिष्ट असल्याचे अमेरिकेनं म्हटलं आहे. या बैठकीत समविचारी देशांसोबत समन्वय वाढवून तंत्रज्ञानाच्या उदयोन्मुख क्षेत्रात सहकार्य वाढवण्याची वचनबद्धता दोन्ही देशांनी व्यक्त केली. या भेटीमुळे दोन्ही देशांमध्ये मजबूत भागीदारी आणि अधिक समृद्ध हिंद- प्रशांत क्षेत्र निर्माण होईल असं अमेरिकेनं म्हटलं आहे.