राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून अजित डोवाल, तर प्रधानमंंत्र्याचे प्रधान सचिव म्हणून निवृत्त प्रशासकीय अधिकारी डॉक्टर पी. के. मिश्रा यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं आज या नियुक्त्यांना मंजुरी दिली. डोवाल आणि मिश्रा यांच्या नियुक्तीचा कालावधी पुढच्या आदेशापर्यंत किंवा प्रधानमंत्र्यांचा कार्यकाळ संपेपर्यंत राहील, असं केंद्रीय आस्थापना मंत्रालयानं कळवलं आहे.
Site Admin | June 13, 2024 9:14 PM | #AjitDoval #PKMishra | narendra modi
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी अजित डोवाल, तर प्रधानमंंत्र्याच्या प्रधान सचिवपदी पी. के. मिश्रा यांची फेरनियुक्ती
