ब्रिटन आणि इजिप्तनं आपल्या विमान कंपन्यांना इराण आणि लेबनॉनची हवाई हद्द टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. हमासच्या प्रमुखाची अलीकडेच हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर या भागात तणाव वाढला आहे. अनेक देशांनी इस्रायल आणि लेबनॉनला जाणाऱ्या विमानसेवा रद्द केल्या असून इतर उड्डाणांसाठी इराण आणि लेबनॉनची हवाई हद्द वापरू नये, असं सांगितलं आहे.
दरम्यान, हमासचा प्रमुख इस्माईल हानिया याच्या हत्येचा सौदी अरेबियाने निषेध केला आहे. ही हत्या इराणच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन असल्याचं सौदी अरेबिया सरकारने म्हटलं आहे.