भारताच्या देशांतर्गत हवाई प्रवासी वाहतुकीत गेल्या वर्षभरात ६ पूर्णांक १२ शतांश टक्क्याची वाढ झाली. गेल्या वर्षी १६ कोटी १३ लाख प्रवाशांनी हवाई मार्गांचा वापर केला. गेल्या वर्षात देशांतर्गत उड्डाणं रद्द झाल्याचं प्रमाण १ पूर्णांक ७ शतांश टक्के इतकं होतं. त्यामुळे ६७ हजार ६२२ प्रवाशांना फटका बसला, अशी माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने दिली आहे.
Site Admin | January 23, 2025 8:32 PM | Air Transport
भारताच्या हवाई प्रवासी वाहतुकीत ६.१२ टक्क्याची वाढ
