हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोग आणि संबंधित अधिकार्यानी हवेची गुणवत्ता निकृष्ट असलेल्या नवी दिल्लीतील राष्ट्रीय राजधानी प्रदेशातील विभागांसाठी श्रेणी निर्धारित कृती आराखडा तयार केला आहे. नवी दिल्ली इथं काल झालेल्या बैठकीमध्ये यासंबंधी काही कडक निर्णय घेण्यात आले. येत्या आठवडाभरात नागरिकांकडून आलेल्या तक्रारींचं निवारण तातडीनं करण्याच्या सूचना हवा गुणवत्ता आयोगानं संबंधित अधिकार्यांना दिल्या आहेत. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित संस्थांकडून सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन होत असल्याची खात्री नोडल अधिकार्यानी करून घेण्याच्या सूचनाही आयोगाकडून देण्यात आल्या आहेत.

हवेची गुणवत्ता
दरम्यान नवी दिल्लीतील राष्ट्रीय राजधानी प्रदेशातील हवेची गुणवत्ता अजूनही गंभीर श्रेणीत आहे, आज सकाळी 7 वाजता 428 हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदवला गेला. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 2 दिवस रात्री आणि सकाळच्या वेळी धुकं राहण्याची शक्यता आहे.