ग्रेडेड रिस्पॅान्स ऍक्शन प्लॅन अंतर्गत वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी उचलेल्या पावलांचा आढावा घेण्यासाठी वायू गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाच्या अध्यक्षांनी आज नवी दिल्लीत बैठक घेतली. दिल्लीचे मुख्य सचिव आणि दिल्ली सरकारच्या संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते. तक्रारींचे जलद निराकरण सुनिश्चित करण्यासाठी नियमांचे उल्लंघन केल्याची प्रकरणे त्वरित हाताळली जावीत, यावरही भर देण्यात आला. वायू प्रदूषण रोखण्यासाठी मशिनद्वारे रस्ते स्वच्छ करणे, पाणी शिंपडणे आणि अँटी स्मोक गन वापरणे यासारखी पावलं उचलली जात आहेत.