दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता अजूनही अत्यंत निकृष्ट या श्रेणीत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार, दिल्लीत काल रात्री 8 वाजता हवेचा गुणवत्ता निर्देशांक, 336 AQI इतका नोंदवला गेला. येत्या दोन ते तीन दिवसांत दिल्ली एनसीआरमध्ये रात्री आणि सकाळच्या वेळी धुकं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक हा 0 ते 50 दरम्यान चांगला, 51 ते 100 दरम्यान समाधानकारक, आणि 101 ते 200 दरम्यान मध्यम मानला जातो.