एअर मार्शल तेजिंदर सिंग यांनी आज नवी दिल्ली इथं भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर, त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून शहीद सैनिकांना आदरांजली वाहिली.
एअर मार्शल तेजिंदर सिंग १३ जून १९८७ पासून भारतीय हवाईदलाच्या सेवेत असून त्यांचं शिक्षण राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, संरक्षण सेवा महाविद्यालय आणि राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयात झालं आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये एअर ऑफिसर कमांडिंग म्हणूनही ते कार्यरत होते. २००७ मध्ये वायुसेना पदक आणि २०२२ मध्ये अतिविशिष्ट सेवापदक या पदकांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.