मंकीपॉक्स विषाणूच्या संशयित रुग्णांवर उपचार करण्याविषयी एम्स अर्थात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ताप, पुरळ असलेल्या किंवा मंकीपॉक्स असणाऱ्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना तपासणीसाठी निवडलं जाईल, असं एम्सनं म्हटलं आहे. संशयित रुग्णाला तत्काळ विलगीकरणात ठेवण्यात यावं असंही एम्सनं मार्गदर्शक सूचनेत म्हटलं आहे.
एम्सने मंकीपॉक्स रुग्णांसाठी पाच खाटा आरक्षित ठेवल्या असून या रुग्णांवर सफदरजंग रुग्णालयात उपचार करण्यात येतील. जागतिक आरोग्य संघटनेनं मंकीपॉक्सच्या प्रसाराबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर एम्सनं या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.