नवी दिल्लीत एम्समध्ये आज मौखिक आरोग्याबाबत कार्यशाळा घेण्यात आली. देशातल्या मौखिक आरोग्यासाठी आवश्यक सोयीसुविधा सुधारणं हा या कार्यशाळेचा मुख्य हेतू होता. निती आयोगाचे सदस्य डॉ. विनोद कुमार पॉल यांनी राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम २.० तयार करण्याचं आवाहन यावेळी केलं. मौखिक आरोग्यासाठी आयुर्वेदाचा वापर करावा आणि बालकांच्या मौखिक आरोग्याविषयी जनजागृती करावी असंही पॉल यांनी सांगितलं.
Site Admin | September 29, 2024 2:56 PM | AIIMS
नवी दिल्लीत एम्समध्ये मौखिक आरोग्याबाबत कार्यशाळेचं आयोजन
