डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

February 11, 2025 7:05 PM | AI | PM Narendra Modi

printer

AIचा जबाबदारीनं वापर आणि नियमनासाठी जागतिक पातळीवर एकत्रित प्रयत्नांची गरज – प्रधानमंत्री

AI अर्थात कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्राचा जबाबदारीनं वापर आणि नियमन यासाठी जागतिक पातळीवर एकत्रितरित्या प्रयत्न करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केली. पॅरिसमध्ये AI कृती परिषदेत सह अध्यक्षपदावरुन ते संबोधित करत होते. सह अध्यक्ष फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रॉन यावेळी उपस्थित होते. या तंत्रज्ञानाचं भविष्य यंत्र नव्हे तर मानवाच्या हातात आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा विकास जबाबदारी,  सामाजिक आणि नैतिक हित ध्यानात ठेवून होईल, याकडे लक्ष देण्याचं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं. 

 

शिक्षण, आरोग्य, कृषी यासारख्या अनेक क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवण्याची क्षमता या तंत्रज्ञानात आहे. त्यासाठी या तंत्रज्ञानाचं लोकशाहीकरण, लोकाभिमुख पणा आणि जगातल्या कमी विकसित देशांनाही याचा लाभ मिळेल, याकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. या क्षेत्रात भारतानं घेतलेल्या आघाडीची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. देशाच्या भाषिक आणि सांस्कृतिक गरजा लक्षात घेऊन भारत स्वतःचं Large language model विकसित करतो आहे. पीपीपी तत्त्वावर हे सुरू असल्याचं ते म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा