अमेरिकेच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळानं काल हयात तहरीर अल शाम या सिरीयामधल्या संघटनेचा प्रमुख अहमद अल शारा याची दमास्कस इथं भेट घेतली. हे शिष्टमंडळ सिरीयातल्या नागरिकांशी संवाद साधून त्यांचा सिरीयाच्या भवितव्याबाबतचा दृष्टीकोन समजून घेईल आणि अमेरिकेची त्यांना कशाप्रकारे मदत होऊ शकते याबाबतही चर्चा करेल असं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.