आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी पणन महासंघानं तूर खरेदीसाठी १२ केंद्रांना मंजुरी दिली. नऊ केंद्रांवरून हमीभावानं तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी तसंच प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया सुरू केल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी बी.आर. पाटील यांनी दिली.
२०२४-२५ हंगामासाठी तूर पिकाची ७ हजार ५५० प्रति क्विंटल दरानं १३ फेब्रुवारीपासून खरेदी प्रक्रिया सुरू झाली आहे. ९ केंद्रावरून शेतकऱ्यांची ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी सुरू आहे.