अहिल्यानगर इथं सत्यशोधक समाजाच्या ४२ व्या अधिवेशनाचं उद्घाटन आज साहित्यिक लहु कानडे यांच्या हस्ते झालं. महात्मा फुले हे आधुनिक भारताच्या प्रबोधन युगाचे पितामह असून त्यांच्या विचारातूूनच लोकशाहीचा पाया घातला गेला असं कानडे यावेळी म्हणाले. उत्तमराव पाटील हे कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष होते. यावेळी दिशा वाडेकर यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उल्लेखनीय वकील पुरस्कार तर सुकन्या शांता यांना दीनमित्रकार मुकुंदराव पाटील उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Site Admin | December 1, 2024 7:13 PM | Ahilyanagar