सन २०४७ पर्यंत विकसित भारताचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संकल्प पूर्ण करण्यात कृषी आणि कृषी संबंधित क्षेत्रं महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल व्यक्त केला. नवी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन परिषदेचा ९६वा स्थापना दिन आणि तंत्रज्ञान दिनाच्या कार्यक्रमात ते बोओलत होते. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा आत्मा असून शेतकरी हा त्याचा आधारस्तंभ आहे, असं सांगून शेतकरी आणि शेती याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य आहे, असं चौहान म्हणाले. यावेळी त्यांच्या हस्ते विविध पिकांचे २५ वाण आणि केवळ शेतकऱ्यांना समर्पित उत्पादनांचं अनावरण करण्यात आलं.