केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान आज नवी दिल्लीत अॅग्रीशुअर फंड आणि कृषीनिवेश पोर्टलचा प्रारंभ करणार आहेत. याशिवाय विविध विभागात कृषी क्षेत्रासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बँका आणि राज्यांच्या प्रयत्नांचं कौतुक म्हणून दिल्या जाणाऱ्या कृषी पायाभूत निधी अर्थात एआयएफ उत्कृष्टता पुरस्कारांचं वितरणही कृषीमंत्र्यांच्या हस्ते केलं जाणार आहे. राज्यांचे मंत्री तसंच विविध राज्याचे आणि बँकाचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या पुरस्कारांमुळे बँकांना त्यांची कामगिरी आणखी सुधारण्यास आणि योजना यशस्वी करण्यात योगदान देण्यास प्रेरणा मिळेल असं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. पीक काढणीनंतरच्या व्यवस्थापनासाठी पायाभूत सुविधा आणि सामुदायिक शेती मालमत्तांच्या निर्मितीच्या उद्देशानं २०२२ मध्ये AIFचा प्रारंभ करण्यात आला होता.
Site Admin | September 3, 2024 9:44 AM | Agriculture Minister Shivraj Singh Chouhan | Krishi Nivesh Portal