कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्याचा कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच होणार आहे. त्यामुळे या कामातील केवायसी आणि इतर तांत्रिक अडचणी दूर करण्याचे, तसेच केंद्र शासनाने दिलेल्या सूचनानुसार राज्यात सोयाबीन खरेदी केंद्रे तातडीने सुरु करण्यात यावीत, असे आदेश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.यासंदर्भात मंत्रालयात आयोजित आढावा आणि नियोजन बैठकीत ते बोलत होते. राज्य शासनाने किमान हवी भावाने सोयाबीन खरेदीचा प्रस्ताव केंद्राला सादर केला होता. त्याला केंद्र शासनाने मान्यता दिली आहे.
Site Admin | September 19, 2024 7:38 PM | Dhananjay Munde