खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी डीएपी खतावरच अवलंबून न राहता पर्यायी खतांचा वापर करण्याचं आवाहन कृषी विभागाने राज्यातल्या शेतकऱ्यांना केलं आहे. डीएपी खतानंतर एसएसपी या खताला सर्वाधिक मागणी असून यात १६ टक्के स्फुरदसह इतर अन्नद्रव्ये आढळून येतात. तसंच डीएपी खताच्या एका गोणी ऐवजी अर्धी गोणी युरिया आणि तीन गोणी एसएसपी खतांचा वापर चांगला पर्याय असल्याचं कृषी विभागाने सांगितलं आहे.
Site Admin | June 20, 2024 7:39 PM | Agriculture Department | farmers | Fertilize