कृषी अंदाजपत्रकात गेल्या दहा वर्षात सहा पटीनं वाढ झाल्याचं कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी काल एका लेखी उत्तरात दिली. 2013-14 मध्ये कृषी अंदाजपत्रक 21 हजार कोटी रुपये होतं त्यात वाढ होऊन 2024-25 मध्ये त्यात 1 लाख 22 हजार कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. त्याशिवाय शेतकरी कल्याणासाठी केंद्राकडून अनेकविध योजना राबवल्या जात असून, शेती हा राज्याचा विषय असल्याने राज्य सरकारांनी शेतीच्या विकासासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक असल्याचंही या उत्तरात म्हटलं आहे.
Site Admin | December 18, 2024 10:15 AM | Agriculture Budget