डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्याला केंद्रिय कृषी मंत्रालयाचा कृषी पायाभूत निधी सर्वोत्कृष्टता पुरस्कार

केंद्रिय कृषी मंत्रालयाच्या कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेअंतर्गत देण्यात येणारा यंदाचा कृषी पायाभूत निधी सर्वोत्कृष्टता पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला आहे. तसंच 2022-23 या वर्षासाठी राज्याला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. नवी दिल्लीत झालेल्या समारंभात केंद्रिय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेअंतर्गत दिलेल्या कर्जावर वार्षिक 3 टक्के सवलत दिली जाते. या योजनेसाठी राज्यात गेल्या ऑगस्ट महिन्यापर्यंत विविध बँकांनी 8 हजार 353 प्रकल्पांसाठी 6 हजार 117 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर केलं आहे.

या कार्यक्रमाच्या अनुषंगानं सर्व राज्यांमधल्या कृषी पायाभूत सुविधा निधीचा लाभ घेतलेल्या प्रकल्पांमधल्या उत्पादनांची दालनं उभारण्यात आली होती. यात राज्यातून रायगड जिल्ह्यातल्या पूजा वायचळ यांच्या फलोत्पादनांच्या स्टॉलचा समावेश होता.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा