विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात सत्तास्थापनेबाबत विविध पातळ्यांवर चर्चा सुरु आहे. महायुतीतल्या शिवसेनेच्या गटनेतेपदी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेपदी अजित पवार यांची निवड कालच झाली. मात्र भाजपा विधिमंडळ पक्षाची नेतानिवड अद्याप बाकी आहे. ती झाल्यावर मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय होईल, असं अजित पवार यांनी आज सातारा जिल्ह्यात कराड इथं सांगितलं.
विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे नेते एकत्र चर्चा करुन मुख्यमंत्रीपदाविषयी निर्णय घेतील, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांनी म्हटलं आहे.