डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

November 2, 2024 9:43 AM

printer

चार वर्षानंतर पूर्व लडाखच्या डेमचोकमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत चीन सैन्याची गस्त सुरू

 
पूर्व लडाख भागातील वास्तविक नियंत्रण रेषेवर भारतीय आणि चिनी सैन्यानं गस्त सुरू केली आहे. भारतीय लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डेमचोक परिसरात एप्रिल 2020 मध्ये उभय सैन्यात संघर्ष झाल्यानंतर सुमारे साडेचार वर्षांपासून थांबवण्यात आलेली गस्त पुन्हा सुरू करण्यात आली आहे. डेपसांगमधील गस्त लवकरच पुन्हा सुरू होईल. गेल्या महिन्यात राजकीय आणि लष्करी पातळीवरील चर्चेनंतर दोन्ही देशांचं सैन्य माघारी घेण्यावर एकमत झालं.
 
 
दिवाळीच्या निमित्तानं, चुशुल मोल्डो, दौलत बेग ओल्डी, हॉट स्प्रिंग, केके पास आणि कोंगकला यासह विविध ठिकाणी भारतीय आणि चिनी सैनिकांनी काल मिठाईची देवाणघेवाण केली. दोन्ही सैन्याने तात्पुरते तंबू काढून टाकून डेपसांग आणि डेमचोक भागातील बांधकामं काढल्यानंतर गेल्या महिन्याच्या 22 तारखेला सैन्य माघारीची प्रक्रिया सुरू झाली. योजनेनुसार, भारत आणि चीननं संवेदनशील भागात गस्त घालताना पूर्वसूचना देण्याचं मान्य केलं आहे.
 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा