अफगाणिस्तानचे गृहमंत्री सिराजउद्दीन हक्कानी यांच्यासह तालिबान संघटनेच्या ३ नेत्यांवर अमेरिकेनं लावलेलं बक्षीस मागे घेतलं आहे. सिराजउद्दीन हक्कानी हे अफगाणिस्तानातलं यापूर्वीचं सरकार उलथून टाकणाऱ्या हक्कानी नेटवर्कचे प्रमुख आहेत. घातक शस्त्रास्त्र निर्मिती आणि हल्ले यासाठी हे नेटवर्क ओळखलं जातं. त्यातलेच अब्दुल अझीझ हक्कानी आणि याह्या हक्कानी यांच्यावर लावलेलं बक्षीसही अमेरिकेने मागे घेतलं आहे. तालिबानी सरकारचे परराष्ट्र मंत्रालय प्रवक्ते झाकिर जलाली यांनी सांगितलं की गेल्या शुक्रवारी अमेरिकन नागरिक जॉर्ज ग्लेझमन याची तालिबानी कैदैतून मुक्तता केल्यानंतर अमेरिकेनं विधायक संबंधांच्या दिशेन टाकलेलं हे पाऊल आहे.
Site Admin | March 23, 2025 8:24 PM | Afganistan
अफगाणिस्तान गृहमंत्र्यांसह तालिबान संघटनेच्या ३ नेत्यांवर अमेरिकेनं लावलेलं बक्षीस मागे
