डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

एअरो इंडिया-२०२५ चं संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

सुरक्षा व्यवस्था मजबूत असेल तरच शांतता प्रस्थापित करणं शक्य आहे, त्यानंतरच आपण एका चांगल्या जगासाठी काम करू शकतो, असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. बंगळुरू इथं एअरो इंडिया २०२५ चं उद्घाटन केल्यानंतर ते आज बोलत होते. एअरो इंडिया हे भारताच्या संरक्षण सामुग्रीचं प्रदर्शन असून ते आशिया खंडातलं सर्वात मोठं प्रदर्शन मानलं जातं.

 

भारतानं नेहमीच शांतता आणि स्थैर्याचं समर्थन केलं आहे, मात्र केवळ एका देशात हे शक्य नसून संपूर्ण जगासाठीच हे महत्वाचं आहे, असं राजनाथ सिंह यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात इतर देश सहभागी झाले यावरून ते आपल्या एक विश्व, एक कुटुंब, एक भविष्य या दृष्टीकोनाशी सहमत आहेत असं दिसतं असं ते म्हणाले. जागतिक स्तरावरच्या समस्यांना तोंड देण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे असंही त्यांनी सांगितलं.

 

AERO India 2025 या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी काल फिजीचे संरक्षणमंत्री पिओ तिकोदोनदुआ यांची बेंगलुरु इथं भेट घेतली. भारत फिजीदरम्यान संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी एका कृतीदलाची स्थापना करण्याबाबत सहमती झाल्याचं त्यांनी सांगितलं. दक्षिण सुदानचे संरक्षणमंत्री लेफ्टनंट जनरल चोल थांग जे बलोक यांचीही सिंग यांनी काल भेट घेतली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा