राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर, आपल्या प्रियजनांना राख्या वेळेवर मिळाव्यात या दृष्टीने भारतीय टपाल खात्यानं 31 जुलै पर्यंतच राख्या पाठवण्याचं नियोजन करण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे. राख्यांचं संभाव्य नुकसान टाळण्यासाठी राख्या असलेली आपली पाकिटे सुरक्षितपणे बंद करणे आवश्यक असून पाकिटावर योग्य पिनकोडसह योग्य पत्ता लिहिणं गरजेचं आहे. याशिवाय आपला मोबाईल क्रमांकही नमूद करण्याचा सल्ला टपाल विभागानं दिला आहे. सीमाशुल्क प्रक्रिया जलद पूर्ण करण्यासाठी पाकिटातून पाठवलेल्या गोष्टी घोषणा पत्राद्वारे अचूकपणे जाहीर करणे गरजेचं आहे. तसंच ज्वलनशील पदार्थ, द्रव किंवा नाशवंत अशा प्रतिबंधित गोष्टी पाठवू नयेत कारण अशा वस्तु जप्त केल्या जाऊ शकतात.
Site Admin | July 20, 2024 10:26 AM | Indian Postal Department | Rakhi