राष्ट्रीय चाचणी संस्थेने जेईईच्या पहिल्या सत्राच्या परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर केलं आहे. बी. ई. आणि बी. टेक या अभ्यासक्रमांसाठी होणारी परीक्षा २२, २३ आणि २४ जानेवारी रोजी घेतली जाणार आहे. त्यासाठीचं प्रवेशपत्र आज जाहीर करण्यात आलं. इच्छुक विद्यार्थ्यांना संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर ती मिळू शकतील. येत्या २८, २९ आणि ३० जानेवारी रोजी बी. ई., बी. टेकसह आर्किटेक्ट, प्लॅनिंग या अभ्यासक्रमांसाठी जेईई परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठीची प्रवेशपत्र लवकरच मिळतील असं संस्थेने पत्रकाद्वारे कळवलं आहे.
Site Admin | January 18, 2025 8:43 PM | JEE
जेईईच्या पहिल्या सत्राच्या परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर
