लोकसभा निवडणुका झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या प्रत्येक बैठकीत या सरकारने आपण काहीतरी जनतेसाठी देत आहोत, असे दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र खरा फायदा अदानी समूहाला करन दिला असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. धारावीमध्ये ५४० एकरचा कुर्ला येथे २१ एकर, मुलुंड, भांडूप आणि कांजुरमार्ग असा एकत्रित २५५ एकर, मढमध्ये १४० एकर, देवनारमध्ये १४० एकरचा भूखंड अदानी समूहाला मिळाला आहे, त्याचा शासन आदेश निघेपर्यंत निवडणुका जाहीर झाल्या नाहीत असं ते म्हणाले. मविआ सत्तेत आल्यावर अदानी समूहाला दिलेले भूखंड काढून घेऊ असं त्यांनी सांगितलं.
Site Admin | October 16, 2024 3:20 PM | Aditya Thackeray