निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकार घाईघाईत निर्णय घेत असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ते मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अद्याप पूर्ण तयार झालेलं नसताना त्यावर विमान उतरवण्याचा स्टंट मुख्यमंत्र्यांनी केला, अशी टीका ठाकरे यांनी केली. नवी मुंबई विमानतळ आणि छत्रपती संभाजीनगर विमानतळाच्या नामांतराचे प्रस्ताव मविआ सरकारच्या काळात दिले होते, मात्र त्यावर अजूनही निर्णय का घेण्यात आला नाही, असा प्रश्नही ठाकरे यांनी उपस्थित केला.
Site Admin | October 11, 2024 7:31 PM | Aditya Thackeray
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकार घाईत निर्णय घेत असल्याची आदित्य ठाकरे यांची टीका
