डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

देशांतर्गत बाजारात कांद्याची पुरेशी उपलब्धता असल्याची केंद्र सरकारची ग्वाही

रब्बी हंगामातल्या कांद्याची बाजारातली आवक वाढत असल्यामुळे कांद्याचे दर स्थिर होत असल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं सांगितलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कांंद्याचं उत्पादन कमी होऊनही देशातल्या बाजारात कांद्याची पुरेशी उपलब्धता आहे.

त्याचबरोबर यंदाच्या रब्बी हंगामात कांद्याचं अंदाजित उत्पादन १९१ लाख टन असून देशातल्या ग्राहकांची गरज भागवण्यासाठी ते पुरेसं आहे, अशी माहितीही या मंत्रालयानं दिली आहे. यंदा तीन लाख ६१ हजार हेक्टर परिसरात खरिपातल्या कांद्याची लागवड करायचं उद्दिष्ट असून ते गेल्या वर्षीपेक्षा १२ टक्के जास्त असेल. त्याचबरोबर खरीप हंगामात देशात दोन लाख ७२ हजार हेक्टरवर टोमॅटोची लागवड करण्याचं उद्दिष्ट असल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा