डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

जगातल्या प्रत्येक क्षेत्रात विकासासाठी तंत्रज्ञानाची आवश्यकता असून तंत्रज्ञान विश्वव्यापी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

जगातल्या प्रत्येक क्षेत्रात विकासासाठी तंत्रज्ञानाची आवश्यकता असून तंत्रज्ञान विश्वव्यापी असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. अमेरिका दौऱ्यात न्यूयार्कमध्ये अमेरिकेतल्या तंत्रज्ञान क्षेत्रामधल्या आघाडीच्या कंपन्यांच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकांची गोलमेज परिषद प्रधानमंत्री मोदी यांनी घेतली. तिथं ते बोलत होते. 

न्यूयॉर्कमधे लाँग आयलंड इथं भारतीय समुदायातर्फे आयोजित कार्यक्रमालाही त्यांनी संबोधित केलं. अमेरिकेतला भारतीय समुदाय म्हणजे भारताचे सदिच्छा दूत असल्याचं ते यावेळी म्हणाले. बोस्टन आणि लॉसएंजलिस इथं दोन भारतीय दूतावास सुरू केले जातील, अशी घोषणा प्रधानमंत्र्यांनी या वेळी केली. 

मोदी यांनी आज न्यूयॉर्कमध्ये कुवेतचे राजपुत्र शेख सबाह अल-खालिद अल-सबाह यांच्याशी तसंच नेपाळचे प्रधानमंत्री के. पी. शर्मा ओली यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. सीईओ राऊंडटेबल या कार्यक्रमात त्यांनी उद्योजकांशी चर्चा केली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा