मुंबई शहरात सध्या फक्त कुर्ला आणि शीव या भागात पाणी साठलेलं असून त्याचा निचरा करण्यासाठी अतिरिक्त पंप उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत दिली. मुंबईतलं जनजीवन पावसामुळे विस्कळीत झाल्याच्या पार्श्वभूमीवर, सध्या परिस्थिती काय आहे आणि ती पूर्ववत करण्यासाठी काय पावलं सरकार उचलत आहे, याबाबतचं निवेदन सरकारने करावं, असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्यानंतर ते बोलत होते.
मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे, असं त्यांनी सांगितलं. येत्या दोन तासांत परिस्थिती पूर्वपदावर येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.