नवीन वर्षाच्या स्वागतासाठी प्रवाशांच्या सोयाीसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे उद्या रात्री विशेष उपनगरीय रेल्वे गाड्या चालवणार आहे. मध्य रेल्वेवर विशेष गाडी सीएसएमटी स्थानकातून आणि कल्याणहून रात्री दीड वाजता सुटेल. हार्बर मार्गावर विशेष गाडी सीएसएमटी आणि पनवेल इथून पहाटे दीड वाजता सुटेल. पश्चिम रेल्वेवर देखील चर्चगेट आणि विरार दरम्यान ८ विशेष गाड्या चालवल्या जातील. चर्चगेटहून ही गाडी रात्री सव्वा वाजता, २ वाजता, अडीच वाजता आणि ३ वाजून २५ मिनीटांनी सुटेल. तर विरारहून पहाटे सव्वा बारा वाजता, पाऊण वाजता, १ वाजून ४० मिनीटांनी आणि पहाटे ३ वाजून ५ वाजता सुटेल.
मुंबईतल्या समुद्र किनाऱ्यांवर प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्टच्यावतीनं उद्या विविध मार्गांवर रात्री २५ जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहे. प्रवाशांसाठी ३१ डिसेंबर रोजी दक्षिण मुंबईतल्या विविध ऐतिहासिक आणि प्रेक्षणिय स्थळांच्या हेरिटेज टूरसाठी वातानुकुलित दुमजली बस चालवण्यात येणार आहे.