डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी मेक्सिकोवर लादलेली अतिरिक्त करवाढ एक महिना विलंबाने होईल लागू

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकोवर लादलेली अतिरिक्त करवाढ एक महिना विलंबानं लागू होईल असं जाहीर केलं आहे. मेक्सिकन राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शीनबॉम यांच्याशी द्विपक्षीय स्तरावर मैत्रीपूर्ण चर्चा झाल्यानंतर आपण हा निर्णय घेतल्याचा खुलासा ट्रंप यांनी केला. फेंटानिल औषधाची अवैधरित्या होणारी तस्करी आणि बेकायदेशीर स्थलांतरितांचा प्रवाह रोखण्यासाठी अमेरिका-मेक्सिको सीमेवर 10 हजार सैनिकांची तैनाती करण्यास सहमती झाली आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्याशीही आपण चर्चा करत असल्याचं ट्रंप यांनी सांगितलं. मेक्सिको, कॅनडातून आणि चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर आजपासून अमेरिकेत अतिरिक्त कर आकारणी प्रस्तावित होती.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा