डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

November 16, 2024 6:39 PM | ECI | Supreme Court

printer

मतदानाच्या एक दिवस अगोदर आणि मतदाना दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींचं पूर्व-प्रमाणीकरण आवश्यक-ECI

मतदानाच्या एक दिवस अगोदर आणि मतदाना दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींचं पूर्व-प्रमाणीकरण आवश्यक आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार निवडणूक आयोगानं राजकीय प्रचार जाहिरातींसाठी नियमावली ठरवून दिली आहे. यासाठी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीकडून पूर्व प्रमाणीकरण करणं बंधनकारक आहे. याकाळात दृक-श्राव्य जाहिराती, ई-वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करायच्या राजकीय जाहिराती, बल्क एसएमएस, व्हॉइस मेसेज, सोशल मीडिया, इंटरनेट संकेतस्थळे यावरच्या जाहिरातींचंही पूर्व-प्रमाणीकरण करणं आवश्यक आहे. समितीनं जाहिरातीत बदल सुचवल्यानंतर समितीकडून तसा संदेश प्राप्त झाल्याच्या २४ तासात उमेदवारानं त्यानुसार दुरुस्त्या करून नवीन जाहिरात सादर करणं आवश्यक आहे. उमेदवार आणि राजकीय पक्षाच्या ब्लॉग, संकेतस्थळ, वैयक्तिक सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट केलेला राजकीय स्वरुपाचा संदेश, मजकूर, छायाचित्र, व्हीडीओ मजकूर राजकीय जाहिरात समजली जाणार नाही, त्यामुळे त्यासाठी पूर्वप्रमाणीकरण आवश्यक नाही.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा