डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मराठी चित्रपटसृष्टीतल्या पहिल्या बाल अभिनेत्री वासंती घोरपडे-पटेल यांचं निधन

मराठी चित्रपटसृष्टीतली पहिली बाल अभिनेत्री आणि पहिली बालगायिका वासंती घोरपडे-पटेल यांचं आज हैदराबाद इथं वार्धक्यानं निधन झालं. त्या १०१ वर्षांच्या होत्या.

 

१९३५ मधे प्रभात कंपनीच्या ‘धर्मात्मा’ चित्रपटातून त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर ‘कुंकू’ चित्रपटात नायिका शांता आपटे यांच्या सोबत ‘भारती सृष्टीत सौंदर्य खेळे’ तसंच ‘अहा भारत विराजे’ ही त्यांनी गायलेली आणि त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी रसिकांची दाद मिळवून गेली. ‘अमरज्योती’, ‘संत तुलसीदास’, ‘अछूत’, ‘दिवाली’, ‘मुसाफिर’, ‘बेटी’, ‘दुःखसुख’, ‘आपकी मर्जी’, ‘भक्तराज’, ‘भाग्यलक्ष्मी’ अशा मराठी आणि हिंदी चित्रपटांमधून त्यांनी काम केलं.

 

‘शारदा’ या संगीत नाटकातही त्यांनी काम केलं होतं. खाँसाहेब धम्मनखाँ आणि पंडित वामनराव सडोलीकर यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं होतं. त्यांच्या सुमारे २०० गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध झाल्या होत्या.
वामनराव सडोलीकर प्रतिष्ठानचा जीवन गौरव पुरस्कार त्यांना मिळाला होता.