डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

सैफ अली खानची प्रकृती स्थिर, आरोपीच्या शोधासाठी १० पथकांची स्थापना

अभिनेता सैफ अली खान याची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पहाटे मुंबईतल्या घरी अज्ञात इसमानं त्याच्यावर चाकू हल्ला केला होता. त्यात त्याला ६ ठिकाणी जखमा झाल्या होत्या, त्यातल्या २ जखमा खोल आहेत. त्यानंतर लीलावती रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यात मणक्यातून चाकूचा तुकडा डॉक्टरांनी बाहेर काढला. 

 

या प्रकरणी एका व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या  प्रकरणाचा तपास करण्यासाठी १० पथकांची नियुक्ती करण्यात केल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी दिली. 

 

दरम्यान, याप्रकरणी विरोधकांनी राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवरुन सरकारवर टीका केली आहे. केवळ आश्वासन देण्याऐवजी कठोर कारवाई करण्याची हिम्मत मुख्यमंत्र्यांनी दाखवावी, असं आव्हान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलं आहे.  

 

देशातल्या सर्व महानगरांमध्ये मुंबई हे सर्वात सुरक्षित आहे. केवळ एका घटनेवरुन मुंबई असुरक्षित आहे असं म्हणणं चुकीचं असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. अशा आरोपांमुळे मुंबईची प्रतिमा खराब होते. मुंबईला आणखी सुरक्षित करण्यासाठी सरकार काम करत असल्याचंही ते म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा