डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

April 5, 2025 7:40 PM | Manoj Kumar

printer

प्रख्यात अभिनेते मनोजकुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

प्रख्यात चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक मनोज कुमार यांच्या पार्थिवावर आज मुंबईच्या पवन हंस स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अभिनेता अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, प्रेम चोप्रा, सलीम खान, रझा मुराद, राजपाल यादव, दिग्दर्शक सुभाष घई यांच्यासह मनोरंजनविश्वातले मान्यवर यावेळी उपस्थित होते. मनोज कुमार यांचं काल पहाटे खासगी रुग्णालयात वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झालं. देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखले जाणारे मनोज कुमार हे भारत कुमार या टोपणनावानेही ओळखले जात. वो कौन थी, शहीद, उपकार, हिमालय की गोद में, गुमनाम, पत्थर के सनम, नीलकमल, रोटी कपडा और मकान, क्रांती, पूरब और पश्चिम हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. चित्रपटसृष्टीतल्या त्यांच्या योगदानासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार तसंच दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा